• Tue. Jul 22nd, 2025

केजे युथ फेस्ट मैदान 2के24 स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या खेळाडूंचा सहभाग

ByMirror

Feb 17, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथील ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये केजीईआय चार दिवसीय स्पोर्ट्स स्पेशल, मैदान 2के24 ही आंतरमहाविद्यालयीव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या 8 पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


विद्यार्थ्यांनी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स आणि भालाफेक यासह विविध प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धा अत्यंत चुरशीची होती आणि संपूर्ण कार्यक्रमात वातावरण उर्जेने भरलेले होते. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉमनवेल्थ गेम्स 2014 मधील सुवर्णपदक विजेते सुभेदार सुखेन डे, ऑलिम्पिक गेम्स 2021 मध्ये सहभागी खेळाडू नायब सुभेदार राहुल रोहेला, जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2021 मध्ये कांस्यपदक विजेते हवालदार पृथ्वीराज पाटील, वर्ल्ड एक्वाटिक चॅम्पियनशिप हवालदार एच लंडन सिंग, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्णपदक विजेते सुभेदार जेरेमी लालरिनुंगा उपस्थित होते.


उपस्थित पाहुण्यांनी युवा खेळाडूंना त्यांच्या अनुभवांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी प्रेरित केले. ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य, डॉ नीलेश उके यांनी सर्व सहभागी महाविद्यालये, प्रमुख पाहुणे आणि मैदान 2के24 ला उत्कृष्ट यश मिळवून दिल्याबद्दल त्यांचे कृतज्ञता व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांनी सर्व व्यवस्थापन संघ, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *