केडगावमध्ये हालत्या देखाव्याची आरस पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील रायगड प्रतिष्ठान मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे कुल दैवत जेजुरीचा खंडोबाचे जागरण गोधळ हा हालता देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्यासोबतच प्रतिष्ठानने हिंदू धर्मातील सांस्कृतिक व सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली आहे. या देखाव्याचा शुभारंभ श्री मयांबा सेवेकरी गुरुवर्य नाथ भक्त अशोकभाऊ पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. हा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गुंड, उपाध्यक्ष विशाल गवळी, नितीन गुंड, प्रवीण भंडारी, महेश गुंड, नगरसेवक अमोल येवले, जालिंदरशेठ कोतकर, विजय सूंबे, अतुल दरंदले, अशोक गुंड, सोनू घेंबूड, सुनील जगदाळे, किरण गुंड, योगेश दिवटे, सुमित लोंढे, संग्राम कोतकर, श्रीकांत गुंड, सुनिल गुंड, संभाजी सातपुते, मनोज पवार, गौरव कार्ले, विकी रोहकले, धनंजय जगदाळे, आकाश लोंढे, सचिन दिवटे, प्रसाद दिवटे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गुंड म्हणाले की, रायगड प्रतिष्ठानला 30 वर्षे पूर्ण झाले आहेत. केडगाव मधील एकमेव प्रतिष्ठान असे असेल की, डीजे मुक्त गणपती बाप्पाची मिरवणूक काढत आहे. या वर्षी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढून ऐतिहासिक, धार्मिक विषयांवर भव्य देखावा साकारला आहेत. यावर्षी अखंड महाराष्ट्राचे कुल दैवत खंडोबा यांचे जागरण गोंधळ हा देखावा साकारण्यात आला आहे. याचबरोबर प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवर्य नाथभक्त अशोकभाऊ पालवे म्हणाले की, केडगाव हे शहराचे उपनगर आहे. परंतु रायगड प्रतिष्ठान हे 30 वर्षा पासून विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित आहे. केडगावमध्ये प्रथमच हिंदु जनजागृती करणारे खंडोबाचे जागरण-गोंधळ हालता देखावा साकारण्यात आला आहे. यामधून केडगावकरांना धार्मिक संदेश दिला आहे. आपल्या देवी देवतांची पूजा कशी करावी.आपल्या येणाऱ्या पिढीला कुल दैवता कोणते आहे? ते समजेल पाहिजे. जागरण गोधळ काय असते हे ही त्यांना समजणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.