शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रीराम, लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान यांचे पात्र साकारलेल्या चिमुकल्यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीराम लल्लाच्या मिरवणुक केडगाव परिसरात उत्साहात पार पडली. अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केडगावच्या सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने
मिरवणुकीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान यांचे पात्र साकारलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तसेच शबरी, जटायु, वशिष्ठ ऋषी, जांबुवंत, अंगद आदी रामायणातील पात्र विद्यार्थ्यांनी साकारले होते. ही मिरवणुक भूषणनगर मार्गे अयोध्यानगर केडगावच्या राम मंदिरच्या दिशेने मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. जय श्रीरामाच्या गजराच्या मार्गाने मिरवणुक मार्ग दणाणून निघाला होता.

मिरवणुकीतील भगवान श्रीरामचे औक्षण करण्यात आले. तर यामधील वानरसेना सर्वांचे आकर्षण ठरली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवान, दत्ताजी जगताप, उद्योजक जालिंदर कोतकर, संभाजी पवार, सुजय अनिल मोहिते, रमेश हिवाळे, सौरभ हिवाळे, आदित्य बोरा, बाळकृष्ण ठुबे, मंगेश चोपडे, प्रमिला कार्ले, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका धर्माधिकारी मॅडम आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिरात मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. श्रीरामच्या आरतीने मिरवणुकीची सांगता झाली. विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.