बरमेचा परिवारा तर्फे स्वागत; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
भगवान महावीर स्वामींच्या 32 आगमसूत्रांचे पूजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने उत्साहात आणि भक्तीभावाने 32 आगम ची शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी भगवान महावीर स्वामींच्या आगमसूत्रांच्या धार्मिक पूजनानंतर आगम दिंडी भक्ति भाव अनी जल्लोषात निघाली. संपूर्ण परिसर जय महाविर – जय आनंदच्या घोषणांनी दुमदुमला.
चातुर्मासाच्या पवित्र निमित्ताने हा धार्मिक सोहळा महासतीजी प.पू. दिव्यदर्शनाजी व प.पू. पुनीतदर्शनाजी म.सा. यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली पार पडला. या सोहळ्याचे यजमानपद सौ. सुवर्णा सोहनलालजी, सुयश, सौ. पुजा सार्थक बरमेचा परिवाराच्या वतीने स्वीकारण्यात आले होते.
सोहनलाल बरमेचा परिवाराने दोन दिवस आगमची धार्मिक सेवा केली. या कालावधीत त्यांनी केडगाव जैन समाजातील सर्व परिवारांचे आदरातिथ्य करून त्यांचे स्वागत केले. भगवान महावीर स्वामींच्या आगमपूजनाचा सोहळा भक्तिभावाने पार पडला.
अंबिकानगर परिसरातून निघालेल्या शोभायात्रेने संपूर्ण परिसर भक्तीमय बनले होते. या प्रसंगी जैन समाजातील महिला व पुरुष वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे सर्व मान्यवर तसेच चातुर्मास कमिटी अध्यक्ष अतुल शिंगवी, उपाध्यक्ष मयूर चोरडिया, मधुर बोकरिया, सेक्रेटरी रुपेश गुगळे, सहसेक्रेटरी विपुल कांकरिया, ललित गुगळे सहखजिनदार राहुल शेटिया,पारसशेटिया,परेश बलदोटा प्रकाश बड़ेरा अनी बरमेचा परिवार,श्री आनंद आशीष प्रार्थना मंडल आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात सुखविपाक सूत्राचे लाभार्थी श्रीकांत पवन मुथियान, उत्तराध्यायन सूत्राचे लाभार्थी संपतलाल राजेश धोका, अल्पोपहाराचे लाभार्थी संतोष विजय ताथेड, श्रीसंघ पूजनाचे लाभार्थी सौ मधुबाला नरेंद्र चोरडिया परिवार होते.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जैन श्रावक संघाचे ज्येष्ठ सदस्य, चातुर्मास कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. समाजातील सर्व स्तरातील बांधवांनी एकत्रित या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेत भक्तिभाव, श्रध्देचे दर्शन घडविले.