खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 व 16 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी 25 डिसेंबर रोजी आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.25 डिसेंबर) सकाळी 10:30 वाजता नेवासा फाटा येथील श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय येथे ही स्पर्धा रंगणार आहे. 16 वर्ष वयोगटात 80, 600, 1600 मीटर धावणे, 80 मीटर हार्डल्स, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, उंच उडी तर 14 वर्ष वयोगटात ट्रायथलॉन अ, ब, क गटात 60 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, शॉट पुट आणि 600 मीटर धावणे ही स्पर्धा पार पडणार आहे.
या स्पर्धेतील विजेते ठरलेले उत्कृष्ट 13 खेळाडू व 19 आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी गुजरात पाठविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता नाव नोंदणी करता येणार आहे. सर्व खेळाडूंनी येताना मूळ जन्म दाखला सोबत घेऊन येण्याचे सांगण्यात आले आहे.