• Wed. May 21st, 2025

नागापूरला थाटण्यात आलेल्या फटाका मार्केटवर कारवाईच्या सूचना

ByMirror

Oct 31, 2024

जिल्हादंडाधिकारी यांनी काढले पत्र

नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला प्रशानसाकडून कारवाईची प्रतिक्षा

नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील नागरी वसाहतीलगत व बाजारपेठेत फटाका मार्केटला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी नागापूर फटाका असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड व सिमोन भाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हादंडाधिकारी गृहशाखा यांनी नियमोचित कार्यवाही करण्याचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त व तहसिलदार यांना काढेल आहे.


नागापूर येथील नागरी वसाहतीलगत व बाजारपेठेत थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या स्टॉलमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना प्रशानसाकडून काय कारवाई करण्यात येते? याकडे तक्रारदार व स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


महानगरपालिका हद्दीतील नागापूर येथे कापडाचे, किराणा सामान, हॉटेल व भाजीपाल्याचे दुकान आहेत. सदर ठिकाणी मोठी बाजारपेठ असून, नागरिकांची दररोज वर्दळ असते. नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या या बाजारपेठेत एमआयडीसी भागातील नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करत आहे. मात्र महापालिकेच्या नगररचनाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर जागेची पहाणी न करता फटाका स्टॉलच्या 11 दुकानांना परवानगी दिली आहे. यामुळे मोठी दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर फटाका मार्केटला दिलेली परवानगी रद्द करुन स्टॉल हटविण्याची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीवरुन कारवाईचे पत्र काढण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *