• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

इंडस्ट्रीज इस्टेटच्या जे.एल.पी. कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

ByMirror

May 12, 2025
माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून 40 लाखांचे काम सुरू

पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची उर्वरीत प्रश्‍न मार्गी लावणार -अनिल शिंदे

माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नातून 40 लाखांचे काम सुरू

नगर (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री असताना शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून प्रभाग 15 मधील अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. कोट्यावधी रुपयांचे विकास कामे मार्गी लागली असून, प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करण्यात आले आहे. विकासात्मक कामे मार्गी लावून नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे काम करण्यात आले. पुन्हा राज्यात महायुतीची सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची प्रलंबीत विकास कामे देखील प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचा विश्‍वास माजी नगरसेवक अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.


प्रभाग क्रमांक 15 मधील लिंक रोड, इंडस्ट्रीज इस्टेटच्या पाठीमागे असलेल्या जे.एल.पी. कॉलनीतील बहुप्रतीक्षित रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक दिलीप सातपुते, दीपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, उद्योजक राजेंद्र शिंदे, जालिंदर पालवे यांच्यासह कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जे.एल.पी. कॉलनीतील रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विशेषतः पावसाळ्यात रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची जाणीव ठेवून माजी नगरसेवक अनिल शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून तब्बल 40 लाख रुपये खर्चाचे रस्त्याचे काँक्रिटीकरण काम मंजूर करून घेतले आहे.


या कामामुळे पावसाळ्यापूर्वीच नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार असून अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल अनिल शिंदे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *