प्रथम विजेत्या संघास 1 लाखाचे बक्षीस
खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होतो -सचिन कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो. अपयशाने खचून न जाता जिद्द व संयमाने पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा खेळाने मिळते. खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होतो. खेळाने युवकांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होत असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी केले.
केडगाव येथील अरणगाव रोड, दूधसागर सोसायटीत रेणुका माता क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी महापौर संदीपदादा कोतकर चषक 2024 क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी कोतकर बोलत होते. याप्रसंगी संजय लोंढे, नगरसेवक मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, सुरज शेळके, आशिष कांबळे, प्रसाद आंधळे, सुरेश लगड, गणेश सातपुते, भूषण गुंड, लक्ष्मण घोडके, महेश सरोदे, सत्यजित शिंदे, अमोल ठुबे, भरत ठुबे, अण्णा शिंदे, दत्ता कोतकर, सतीश जेजुरकर, सतीश चंदन, विशाल धोंडे, बंटी विरकर, भरत गारुडकर, उमेश सुंबे, निलेश सातपुते, उमेश कोतकर, रामदास काकडे, अनिल ठुबे, सोमनाथ गुंड, अनिकेत लोंढे, विकास गुंड, मंगेश लोंढे, दादा घेंबुड, आकाश बडे आदींसह पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित लोंढे म्हणाले की, राजकारणात असताना माजी महापौर संदीपदादा कोतकर यांनी क्रीड व सांस्कृतिक क्षेत्राला नेहमीच खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांच्या प्रेरणेने नवोदित खेळाडूंना चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. युवा वर्ग व्यसनाकडे वळत असून, निर्व्यसनी पिढी घडण्यासाठी युवकांना खेळासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्रिकेट स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अनेक संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. 21 जानेवारी पर्यंत क्रिकेटचे सामने रंगणार असून, यामधील प्रथम विजेत्या संघास 1 लाख, उपविजेता संघास 71 हजार, तृतीय विजेत्या संघाला 41 हजार रुपये तर चतुर्थ विजेत्या संघाला 21 हजार रोख चषक व स्मृतीचिन्ह बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर इतर उत्कृष्ट खेळाडूंना देखील आकर्षक रोख बक्षिस ठेवण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे सुमित लोंढे, ओंकार कोतकर, उमेश ठोंबरे, भरत मतकर, शुभम लोंढे परिश्रम घेत आहे.