• Thu. Mar 5th, 2026

निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्तीची शपथ

ByMirror

Oct 28, 2024

पर्यावरण संवर्धनासाठीचा निर्धार

प्रदूषणाचा पसरलेला अंधकार जागृकतेने दूर होणार -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत, या दिवाळीत फटाके न वाजविण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांमध्ये फटाक्यांची असलेली कुतूहलता व आनंद. मात्र फटाक्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्तीचा निर्धार केला आहे. नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.


नवनाथ विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे व वंचित घटकांना मदत करण्याचे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अमोल वाबळे, संदिप डोंगरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.


पै.नाना डोंगरे यांनी दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण आहे. पर्यावरणाच्या समतोल साधण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. प्रदूषणाचा पसरलेला अंधकार जागृकतेने दूर होणार असल्याची भावना व्यक्त केली. तर प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्तीचा त्यांनी संदेश दिला. या अभियानात शालेय विद्यार्थी आदिती तरटे, हर्षदा ठाणगे, श्रावणी फलके, अनुष्का फलके, भाग्यश्री रोहोकले, सार्थक गायकवाड, कार्तिक गायकवाड, कार्तिक फलके, नितीन नवले, कृष्णा सानप, सार्थक पाचारणे, यश पवार आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *