• Sun. Feb 15th, 2026

बेलदार गल्लीत घराच्या गच्छीचे स्लॅब तोडून गृहपयोगी भांडे लंपास

ByMirror

Oct 31, 2024

तर तक्रारदारास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी

चुलत पुतण्या व नातूंवर अदखलपात्र गुन्हा दाखल

नगर (प्रतिनिधी)- बेलदार गल्ली येथे चुलत पुतण्या व चुलत नातूंनी शेजारी असलेल्या घराच्या गच्छीचे स्लॅब तोडून गृहपयोगी भांडे लंपास केल्याप्रकरणी जाब विचारले असता, त्यांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सय्यद अजगर अकबर (वय 82 वर्षे, रा. बालिकाश्रम रोड) यांच्या फिर्यादीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार सय्यद अजगर अकबर यांचे बेलदार गल्ली येथे वडिलोपार्जित घर असून, त्याच्या शेजारी चुलत पुतण्या व चुलत नातू राहतात. त्यांनी तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित असलेल्या घराच्या गच्छीचे स्लॅब तोडून घराचे नुकसान केले व गृहपयोगी भांडे घेऊन गेले.

या प्रकरणी विचारणा केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी सय्यद जाकीर रफिक, सय्यद सुफियान शकील, सय्यद मुशरान शकिल (सर्व रा. बेलदार गल्ली) यांच्यावर 29 ऑक्टोबर रोजी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *