• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्येष्ठ सेवानिवृत्त एसटी कर्मचारी मोहनराव त्र्यंबके यांचा सन्मान

ByMirror

Jan 10, 2025
एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी एकवटले

एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी एकवटले

चांगल्या कामाचे नेहमी कौतुक होते -बलभीम कुबडे

नगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या पारनेर आगारातील ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी मोहनराव त्र्यंबके यांचा राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा जेष्ठ नागरिक वसंत शेटीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गुळवे, संजय वाघमारे, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, अय्युब शेख, आदींसह ग्रामस्थ व सेवानिवृत्त एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बलभीम कुबडे म्हणाले की, केलेल्या चांगल्या कामाचे नेहमी कौतुक होत असते. त्र्यंबके कार्यरत असताना त्यांनी नेहमीच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली वागणुक देवून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले. 33 वर्षे त्यांनी एकाच ठिकाणी व एकाच पदावर सेवा देऊन आपले वेगळे स्थान निर्माण केले. मिरजगाव येथील त्र्यंबके त्यांच्या कार्यशैलीने जिल्ह्यातील प्रत्येक सेवानिवृत्त एसटी कर्मचारी यांना सुपरिचत आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला असल्याचे सांगितले.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्र्यंबके यांना बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवाजी पवार, खोलम, कदम, अर्जुन औटी यांनी आपल्या मनोगतात त्र्यंबके यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करुन पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी 92 वर्षीय ज्येष्ठ चालक सखाराम पातारे व एसटी बँकेचे माजी कर्मचारी पोपटराव अडसूळ यांची कन्या योगिता अडसूळ हिने सीएच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा देखील सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र शिंदे यांनी केले. आभार भगवंत म्हस्के यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *