वंचितांच्या अंगणात उजळला आनंदाचा दिवा
दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा सण -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने यंदाही समाजातील निराधार व वंचित घटकातील ज्येष्ठ नागरिकांसह दिवाळी साजरी करून माणुसकीची दिवाळी उजळवली. भिंगार येथील रोकडेश्वर मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमात निराधार नागरिकांना मिठाई आणि फराळ वाटप करून त्यांच्याबरोबर फटाक्यांची आतषबाजी करुन दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
भाऊबीजच्या दिवशी रंगलेल्या या सोहळ्यात बहिणींनी आपल्या भावांना औक्षण करून पारंपरिक वातावरणात सणाचा आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार (मन्नूशेठ) झंवर, उद्योजक लॉरेन्स स्वामी आणि चुन्नीलाल झंवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेशराव वराडे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, अभिजीत सपकाळ, जहीर सय्यद, ईवान सपकाळ, विलास आहेर, सरदारसिंग परदेशी, रतनशेठ मेहेत्रे, किरण सपकाळ, अशोकराव पराते, अविनाश जाधव, जयश्रीताई पोटे, प्रांजली सपकाळ, सुरेखाताई आमले, राजश्रीताई राहिंज, संगीता सपकाळ, सुंदरराव पाटील, विठ्ठल (नाना) राहिंज, रामनाथ गर्जे, कोंडीराम वाघस्कर, सखाराम अळकुटे, अशोकराव लोंढे, जालिंदर अळकुटे, सुमित चोपडा, मनोहरराव दरवडे, नवनाथ आमले, सुनील कसबे, संतोष चोपडा, रवी ताठे, रामचंद्र शिंदे, काशिनाथ साळुंके, दीपकराव धाडगे, शशिकांत बोरुडे, भगवानराव दळवी, विजय बोथरा, संजय भिंगारदिवे, शशिकांत पवार, देवा देशपांडे, तुषार घाडगे, अविनाश पोतदार, दशरथराव मुंडे, सुधीरशेठ कपाळे, दिलीपशेठ गुगळे, दत्तात्रय लाहुंडे, प्रकाश देवळालीकर, शिरीषराव पोटे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, दिवाळी हा सण फक्त दिवे लावण्याचा नाही, तर समाजातील प्रत्येकाच्या मनात आनंदाचा दिवा पेटवण्याचा आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा आणि समाजात माणुसकीचा उजेड पसरवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सतत सामाजिक योगदान देण्याच्या ध्येयाने प्रेरित होवून ग्रुपचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदकुमार (मन्नूशेठ) झंवर यांनी सांगितले की, दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण आहे. हरदिन ग्रुपने या सणाचे खरे स्वरूप साकारत वंचितांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. या सामाजिक उपक्रमातून खऱ्या अर्थाने दिवाळीचा संदेश समाजात पोहोचवला गेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सचिनशेठ चोपडा यांनी आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना वेळ देणं दुर्मिळ झालं आहे. पण हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सेवा हीच खरी पूजा हे तत्व अंगीकारून वंचितांसाठी कार्य करुन सामाजिक योगदान देत आहे. सर्वांनी मिळून या समाजातील निराधार, ज्येष्ठ, आणि वंचित घटकांसाठी हातभार लावावा. समाज तेव्हाच समृद्ध होतो, जेव्हा प्रत्येक घरात आनंदाचा दिवा तेवतो, असे त्यांनी सांगितले.
हरदिन ग्रुपच्या कार्यातून समाजातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि सामाजिक संवेदनशीलतेचा दिवा प्रत्येक हृदयात प्रज्वलीत करावा. हीच खरी दिवाळी, आणि हाच माणुसकीचा उजेड असल्याचे जयश्रीताई पोटे यांनी सांगितले. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, चुन्नीलाल झंवर यांनीही मनोगत व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक केले. पाहुण्यांचे स्वागत सर्वेश सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेशराव वराडे यांनी केले. आभार अभिजीत सपकाळ यांनी मानले.
