उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
शिवसेना एकजुटीने शहरात पुन्हा भगवा झंझावात -सचिन जाधव
नगर (प्रतिनिधी)- शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने अरणगाव रोड येथील पांजरपोळ गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विकी लोखंडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, गणेश कवडे, संतोष ग्यानप्पा, बबलू शिंदे, दत्ता कावरे, आनंदराव शेळके, वैद्यकीय मदत कक्षाचे रणजीत परदेशी, ओमकार शिंदे, सचिन शिरसूळ, अंगद महानवर, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन जाधव म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांमुळे शिवसेना घराघरात पोहचली. त्यांच्या विकासात्मक राजकारण व समाजकारणाला कार्यकर्ते जोडले गेले आहे. शिवसेनेत आजी-माजी नगरसेवक जोडले गेल्याने शहरात मोठी ताकद निर्माण झाली असून, शहरात पुन्हा भगवा झंझावात सुरु झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
विकी लोखंडे यांनी सांगितले की, शिवसेनेचा राजकीय प्रवास केवळ समाजकारणावर आधारित आहे. त्याच दृष्टीकोनातून शिंदे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गोशाळेत चारा वाटपाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.