प्रतिक शेकटकर व शाहीन शेकटकर यांचा बेस्ट टीचर अवॉर्डने गौरव
नगर (प्रतिनिधी)- येथील ग्रेड प्लस अकॅडमीचे पाच विद्यार्थी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत चमकले. ग्रेड प्लस अकॅडमीचे संचालक प्रतिक शेकटकर आणि संचालिका शाहीन शेकटकर यांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांसह बेस्ट टीचर अवॉर्ड प्राप्त शेकटकर दांम्पत्यांचा सत्कार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते झाला. यावेळी सुनिल शेकटकर, रईस शेख, कुणाल शेकटकर, विजय भोसले आदींसह सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पार्श बंब याने (लेवल 6) या गटा मध्ये द्वितीय क्रमांक, राजवीर थोरात आणि अन्वी खरमाळे यांनी (ज्युनिअर लेवल) अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकवाला. स्वप्रीत गुंड याने (लेवल 1 अ) व सचिन पाटील याने (लेवल 1 ब) चौथा क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना ग्रेड प्लस अकॅडेमीचे प्रतिक शेकटकर व शाहीन शेकटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली भांडवलकर व संचिता शिंदे यांनी केले.