पुणे विभागीय स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंची निवड; दमदार कामगिरीने वेधले जिल्ह्याचे लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूंनी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली असून, त्यापैकी अनेक खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खो-खो- वयोगट 14 वर्ष (मुली) संघाला तृतीय क्रमांक व कु. मानसी वाबळे पुणे विभागीय निवड चाचणीसाठी निवड.
कबड्डी- वयोगट 17 वर्ष (मुले) संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
उत्कृष्ट खेळ करणारे खेळाडू कार्तिक गुंड, सुमित सावंत, संस्कार सप्रे, मनीष देव्हारे.
मल्लखांब (रोप)- वयोगट 14 वर्षे (मुली) तेजस्विनी शेळके हिने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
जलतरण स्पर्धेतही फिरोदियांचा दबदबा राहिला. वयोगट 14 वर्षे (मुली)- कु. त्रिवेणी पंडित 200, 100 आणि 50 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत प्रथम क्रमांक, पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड. स्वरा खिल्लारी 100 मीटर फ्रीस्टाईल, 50 मीटर बॅक आणि 50 मीटर बटरफ्लायमध्ये द्वितीय क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी निवड.
(मुले) स्वराज लोटके 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रथम क्रमांक, ओंकार शिंदे 50 मीटर बॅक द्वितीय क्रमांक, वेदांत कराड 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रथम, 100 मीटर फ्रीस्टाईल व 50 मीटर ब्रेस्ट द्वितीय क्रमांक, सर्व विभागीय निवडीस पात्र.
वयोगट 17 वर्षे (मुली)- कु. चैत्राली धर्माधिकारी 400 मीटर फ्रीस्टाईल व 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रथम, 50 मीटर बॅक द्वितीय क्रमांक, पुणे विभागीय निवड.
मैदानी (ॲथलेटिक्स) आणि रोलर स्केटिंगमध्येही चमकदार कामगिरी
ॲथलेटिक्स- हर्षद गुंड गोळाफेक (प्रथम क्रमांक), ओम पवार 400 व 600 मीटर धावणे (प्रथम क्रमांक) व 80 मीटर अडथळा शर्यत (प्रथम क्रमांक)
गायत्री शिर्के 400 व 600 मीटर धावणे (प्रथम क्रमांक)
हर्षदीप पवार 100 व 200 मीटर धावणे (द्वितीय क्रमांक)
पलक जगदाळे 100 मीटर धावणे (तृतीय क्रमांक)
सई निमसे 400 मीटर धावणे (तृतीय क्रमांक)
रोलर स्केटिंग- संस्कार कुलकर्णी 17 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, विभागीय स्पर्धेसाठी पात्र.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, तसेच शिक्षक कल्पना पाठक, वैभव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक कैलास करपे, गणेश मोरे, योगेश वागस्कर, किरण हंगेकर आणि विकास साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.