• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

कवयित्री सरोज आल्हाट यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यसेवा पुरस्कार जाहीर

ByMirror

Oct 17, 2024

जळगावला आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव (अडावद, ता. चोपडा) येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यसेवा पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जळगाव मध्ये आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी, उपाध्यक्ष डॉ. जावेद शेख व सचिव जुबेर शाह यांनी दिली.


सरोज आल्हाट गेल्या 30 वर्षापासून साहित्य व सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्या अनेक वर्षापासून काव्यलेखन करत असून, त्यांचे अश्रूंच्या पाऊलखुणा, सखे, कविता तुझ्या नी माझ्या, अनन्यता असे चार काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक इंग्रजी व मराठी मासिकांचे संपादन त्यांनी केले आहे. दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बालकल्याण, परित्यकत्या, आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्‍न, कुष्ठरुग्ण, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, एड्सग्रस्त या घटकांसाठी त्या सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *