• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ByMirror

Nov 9, 2024
शहराला मेट्रोसिटी करण्यासाठी युवक जगताप यांच्या पाठिशी -जुनेद खान

आ. संग्राम जगताप यांना दर्शविला पाठिंबा

शहराला मेट्रोसिटी करण्यासाठी युवक जगताप यांच्या पाठिशी -जुनेद खान

नगर (प्रतिनिधी)- झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर एकजुटीने महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा दर्शविला. मा. आ. अरुणकाका जगताप व आ. संग्राम जगताप यांनी युवकांचे पक्षात स्वागत करुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी जुनेद खान यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.


याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, मुजाहिद बेग, शैबाज शेख, दीपक वाघ, इमरान बागवान, तन्वीर खान, गौरव हरबा, मोहसिन शेख, फिरोज खान, परवेज शेख, साहिल शेख, शुभम गायकवाड, ऋषीकेश जगताप, कुणाल ससाणे, ओमकार मिसाळ, मंगेश शिंदे, स्वप्निल कांबळे, आशुतोष पानमळकर, राहुल थोरात, समीर खान, मोहसीन शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मा. आ. अरुणकाका जगताप यांनी युवकांसह नागरिकांचा आ. संग्राम जगताप यांना मिळणारा पाठिंबा हेच त्यांच्या कामाची खरी पावती असल्याचे स्पष्ट करुन, युवकांना त्यांनी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आ. संग्राम जगताप म्हणाले की, विधानसभा निवडणुक युवकांनी हातात घेतली असून, विकासाचा अजेंड्याला त्यांचा प्रतिसाद मिळत आहे. शहर विकासासाठी राजकारण न करता, फक्त विकास साधण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


जुनेद खान म्हणाले की, शहराला विकासाची दिशा देणारे आ. संग्राम जगताप प्रत्येक युवकांच्या ह्रद्यात वसले आहे. खेड्याची प्रतिमा पुसून त्यांनी शहराला चालना देण्याचे काम केले. शहराचा विकास होत असल्याने मॉल पासून ते आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचे दालन शहरात दाखल होत आहे. यामुळे युवकांचा रोजगाराचा प्रश्‍न सुटत आहे. शहराला मेट्रोसिटी करण्यासाठी युवक त्यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, मोठ्या शहरात रोजगारासाठी जाणारे युवकांना आपल्या शहरातच रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याचे कार्य आ. संग्राम जगताप यांनी केले. त्यांचा विकासात्मक व्हिजन युवकांना भावला असून, त्यांच्यासाठी युवकांचा मिळत असलेला पाठिंबा अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *