पिंपरी चिंचवड मध्ये झाला सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील उद्योजक सुजित बाळाराम सरफळे यांना सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. शिवजयंती निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद पिंपरी चिंचवड (जि. पुणे) आणि स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने सरफळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील हिरुरकर, एअर फोर्स (वायुसेना) टेक्निकल ऑफिसर सुरेश पोखरकर, राहुल शिंदे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर, उमेश बांदल, भाग्यदेव घुले, अभिनेते प्रशांत तपस्वी, देव झुंबरे, जगदीश सांधानशिव, काजल शिंदे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कलाकार, साहित्यिक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश राजुरकर, उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे आणि खजिनदार सिद्धार्थ शिंदे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते..
सुजित बाळाराम सरफळे हे इम्पेक्स प्रॉपर्टीजचे संस्थापक असून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेले, विश्वासार्ह व प्रेरणादायी उद्योजक म्हणून ओळखले जातात. अत्यंत साध्या सुरुवातीपासून त्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या बळावर इम्पेक्स प्रॉपर्टीज ही एक विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रँड म्हणून उभी केली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक होतकरु युवक-युवतींना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे.
“ग्राहकाचा विश्वास हीच खरी संपत्ती” या तत्त्वावर काम करत त्यांनी अनेक गुंतवणूकदारांचे स्वप्न सुरक्षित आणि यशस्वी गुंतवणुकीत रूपांतरित केले आहे. त्यांचे कार्य, चिकाटी आणि सामाजिक जबाबदारी याची दखल घेऊन आज त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
