• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

ByMirror

Nov 8, 2025
तरुणाईच्या उत्साहपूर्ण वातावरणात लोकनृत्य व लोकगीतांच्या सादरीकरण

भारताला पुढे नेण्यासाठी स्मार्ट पर्सन बना – दत्तात्रय भिसे (सहाय्यक आयुक्त विक्रीकर जीएसटी)


तरुणाईच्या उत्साहपूर्ण वातावरणात लोकनृत्य व लोकगीतांच्या सादरीकरण


चित्रकला, वकृत्व आणि कवितेच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांवर तरुणाई झाली बोलती

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय व युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व न्यू आर्ट्‌स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडले. युवक-युवतींनी लोकनृत्य व लोकगीताचे सादरीकरण करुन भारतातील संस्कृतीमधील विविधतेचे दर्शन घडविले. कथा लेखन, चित्रकला, कविता, वकृत्व स्पर्धेतून सामाजिक विषय मांडले.


न्यू आर्ट्‌स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात शुक्रवारी (दि.7 नोव्हेंबर) जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त विक्रीकर (जीएसटी) दत्तात्रय भिसे यांच्या हस्ते झाले. यावेळी युवानचे संदीप कुसळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, भाऊराव वीर, बालाजी केंद्रे, प्रविण कोफ्लढावळे, वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब जगताप, न्यू आर्ट्‌स कॉलेजचे उपप्राचार्य (विज्ञान शाखा) प्रा. अनिल आठरे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुधाकर सुंबे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे म्हणाले की, युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. युवकांमध्ये क्रीडा गुणांबरोबर सांस्कृतिक कौशल्य निर्माण व्हावे हा या मागचा उद्देश आहे. यामधील वैयक्तिक स्पर्धेतील पहिल्या दोन क्रमांकाचे स्पर्धक व सांघिक मधून विजेते संघ विभागीय युवा महोत्सवाला जाणार आहेत. तर यातून महाराष्ट्राचा संघ निवडून ते राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभाग नोंदवणार आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्वातील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.


सहाय्यक आयुक्त विक्रीकर (जीएसटी) दत्तात्रय भिसे म्हणाले की, मनाने हरला नाही, तर विजय निश्‍चित असतो. स्वतःमधील क्षमता ओळखा, एका ठिकाणी न थांबता सतत पुढे जात रहा. कोणतेही स्वप्न साध्य करण्यासाठी शिकण्याचा प्रयत्न करा. स्मार्ट होण्यासाठी अपडेट व्हा. भारताला पुढे नेण्यासाठी स्मार्ट पर्सन बना. संधी मिळेल, तेव्हा त्याचे सोने करा. प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर युवकांनी आपल्या मधील त्रुटी व गुण ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच कौन बनेगा करोडपती मधील आपले अनुभव विशद केले.


जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत पार पडले. लोकनृत्य आणि लोकगीत सादरीकरणांनी वातावरण भारावले. वंदे मातरम’ गीताच्या सादरीकरणाने स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाला उजाळा देत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तर कविता व वकृत्व स्पर्धेतून समाजातील ज्वलंत प्रश्‍न मांडण्यात आले. या विविध स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. श्‍याम शिंदे, चंद्रकांत देठे, संजय ससाणे, नूरील प्रभात भोसले, संगीता देऊळगावकर, निशिगंधा अतुल डावरे, प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, प्रा. रवींद्र जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर पवार, अवधूत शेजूळ, मिना पाचपुते, साक्षी दळवी यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *