आयडियलच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी; 3 खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने नुकतेच सब ज्युनिअर व सीनियर मुले-मुली यांची जिल्हास्तरीय निवड चाचणी उत्साहात पार पडली. आनंद विद्यालय गुलमोहर रोड येथे झालेल्या या स्पर्धेत शहरासह जिल्ह्यातील 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
आयडियल आनंद विद्यालय शाखेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 3 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कास्य पदक पटकाविले. यामध्ये शौर्य दाने, स्नेहा शिंदे, खुशी सारस यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अर्णव खिळे व राजवीर निंबाळकर यांनी रौप्य आणि स्वयम काजळे, प्रेक्षा शेळके, विवान चांदणे यांनी कास्यपदक मिळवले.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नाशिक येथे 18 ते 20 जुलै रोजी होणाऱ्या राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांना प्रशिक्षक अमोल काजळे व रोहित काळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल शहराचे आमदार संग्राम जगताप, तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगरचे शहर अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष संतोष लांडे, तायक्वांदोचे राज्य उपाध्यक्ष तथा शहर सचिव घनश्याम सानप, सहसचिव गणेश वंजारे, खजिनदार धर्मनाथ घोरपडे, संपदा लांडगे आदींनी अभिनंदन केले आहे.