कृष्णाली फाऊंडेशन व कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशनचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृष्णाली फाऊंडेशन आणि कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालघर प्रकल्पातील मुलांना अल्पोपहार व किराणा किटचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके, प्रियंका बोबडे-शेळके, कृष्णाली फाऊंडेशनचे खजिनदार अमर बोबडे, सहखजिनदार संग्राम आंधळे, सहसचिव शिवाजी उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रियंका बोबडे-शेळके यांनी वंचित मुलांच्या भवितव्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रशांत पाटील शेळके म्हणाले की, सामाजिक संवेदना जागृक ठेऊन प्रत्येकाने योगदान दिल्यास समाजातील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आजचे विद्यार्थी हे सक्षम भारताचे भविष्य असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्राम आंधळे यांनी संस्थेच्या माध्यमातून गरजू घटकातील विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांची जिव्हाळ्याने विचारपूस केली. बालघर प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
