पहाटेच केली रोकडेश्वर हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर व गुरुद्वारा परिसराची स्वच्छता
भारत वर्षातील सर्वात मोठा उत्सव -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (22 जानेवारी) पहाटे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर व गुरुद्वारा परिसराची स्वच्छता करण्यात आली. तर श्रीरामची आरती करुन लाडूचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, संतोष लुणिया, सिए रवींद्र कटारिया, दीपक धाडगे, सुमेश केदारे, मेजर दिलीप ठोकळ, श्रेयांश कटारिया, रमेश वराडे, विकास भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, दीपक अमृत, रमेश कोठारी, श्रीरंग देवकुळे, सरदारसिंग परदेशी, राजू शेख, अशोकराव भुजबळ, तुषार घाडगे, राजू कांबळे, प्रवीण दुराफे, रामनाथ गर्जे, अशोक पराते, सुंदर पाटील, अविनाश जाधव, जालिंदर अळकुटे, बाळासाहेब झिंजे, संजय नायडू, विकास निमसे, राजदेव दीक्षित, नारायण नायकु, देविदास गंडाळ, कृष्णा साठे, मंगेश चौधरी, राधेश्याम ठाकुर, विनोद यादव, सुधीर तेलंगे, भाऊसाहेब गुंजाळ, राम झिंजे, संजय बकरे, भाऊसाहेब गायकवाड, संजय भंडारी, अरुण वराडे, निलेश चंडाले, पार्वती रासकर, मनीषा शिंदे, भारतीताई कटारिया, वनिता दळे, सुनीता झिंजे, मंगल भुजबळ, रीता दीक्षित, सौ. हिंगणे, भंडारी, सुरेखा बेडगे आदी उपस्थित होत्या.
पहाटेच हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य हातात झाडू घेऊन परिसरात हजर होते. मंदिर व गुरुद्वारा परिसराची संपूर्ण स्वच्छता सदस्यांनी केली. तर जय श्रीरामाच्या गजराच्या संपूर्ण परिसर दणाणून निघाला. संजप सपकाळ म्हणाले की, अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा भारत वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. सर्वांच्या मनातील इच्छा व स्वप्न या क्षणाने पूर्ण होत आहे. या सोहळ्याने समाजातील कटूता संपून खऱ्या राम राज्याची पुनर्निमाणाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
