अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून मनोज मदान व अर्जुन मदान परिवाराच्या वतीने अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गरजू घटकांना मिष्टान्न भोजन व प्रसादचे वाटप करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी डॉ. रंगनाथ सांगळे व मंजूश्री सांगळे यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांची आरती करण्यात आली. तर राष्ट्रवादीचे प्रा. माणिक विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिष्टान्न भोजन व प्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, राजा नारंग, मनोज मदान, प्रशांत मुनोत, धनंजय भंडारे, अर्जुन मदान, अमित खामकर, कैलाश नवलानी, सिमर वधवा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, करन धुप्पड, संदेश रपारिया, अजय पंजाबी, सौरभ पोखरणा, अभिमन्यू नय्यर, बलजीत बिलरा, गुलशन दंडवाणी, राम बालानी, राजेंद्र कंत्रोड, किशोर मुनोत, सोमनाथ चिंतामणी आदी उपस्थित होते.

अर्जुन मदान म्हणाले की, अयोध्येत श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही रामराज्याची नांदी ठरणार आहे. पाचशे वर्षानंतर सर्वांच्या मनातील स्वप्न साकारले गेले. सर्वांसाठी हा भावनिक व आनंदाचा क्षण असून, या आनंदात सर्वसामान्य गरजू घटकांना सामावून घेण्यासाठी लंगर सेवेच्या माध्यमातून मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते यांनी मागील चार वर्षापासून शहरात भूकेलेल्यांची भूक भागविण्याचे कार्य लंगर सेवा करत आहे. प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मदान परिवाराने राबविलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. या सेवा कार्यात प्रशांत मुनोत यांचे देखील योगदान लाभले. भगवान श्रीराम, सिता व लक्ष्मणच्या वेशभूषा केलेल्या युवक-युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर फटाक्यांच्या आतषबाजीत यावेळी आनंदोत्सव साजरा करुन मिष्टान्न भोजन व प्रसादचे वाटप करण्यात आले.
