खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू मिलन मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (दि.2 फेब्रुवारी) होणाऱ्या या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे व खजिनदार तथा नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे फेब्रुवारीत पुणे येथे ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पारनेर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, युवा नेते हर्षवर्धन कोतकर, विलास चव्हाण, बाळू भापकर, संदिप डोंगरे, मोहन हिरनवाळे, सुनिल भिंगारे, दिलावर शेख, साहेबराव बोडखे, अरुण फलके, अनिल डोंगरे, डॉ. विजय जाधव, पंच शुभम जाधव, ईश्वर तोरडमल, संजय डफळ उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा वरिष्ठ ग्रीको रोमनसाठी 55, 60, 63, 67, 72, 77, 82, 87, 97, 130 (जन्म दि. 2005), सब ज्युनिअर 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92, 110 (जन्म दि. 2006, 2007, 2008) या वजनगटात होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता खेळाडूंचे वजन घेऊन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. यामधील विजेते खेळाडू ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सर्व खेळाडूंनी स्पर्धेला येताना मुळ आधार कार्ड, शाळेचा दाखल व त्यांची झेरॉक्स सोबत आणणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संभाजी निकाळजे 9970982213, गणेश जाधव 8237373792 व पै. नाना डोंगरे 9226735346 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.