• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहर निवड चाचणीचे आयोजन

ByMirror

Oct 11, 2023

सर्जेपुरा येथील छबु पैलवान तालीम मध्ये रंगणार कुस्त्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर तालीम संघाच्या वतीने शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी शहर कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी शहरातील कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन शहर तालीम संघाचे अध्यक्ष पै. नामदेव लंगोटे यांनी केले आहे.


धाराशिव (उस्मानाबाद) येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून, या स्पर्धेला जिल्ह्याचा संघ पाठविण्यासाठी निवड चाचण्या होत आहे. अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी सकाळी 11 वाजता सर्जेपूरा येथील छबु पैलवान तालीम येथे होणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे व खजिनदार पै. नाना डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ ते दहा या वेळेत वजनासाठी मल्लांनी उपस्थित रहावे. वजनानंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

निवड चाचणी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो वजन गटात (गादी व माती) होणार आहे. शहरस्तरावर निवड झालेल्या मल्लांना जिल्हा निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेला येताना खेळाडूंनी पासपोर्ट फोटो व आधारकार्ड सोबत आनणे आवश्‍यक आहे.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष पै. अजय अजबे, उपाध्यक्ष पै. विलास चव्हाण, पै. सुनील भिंगारे, पै. कैलास गर्जे, सचिव पै. मोहन हिरणवाळे परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *