• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ

ByMirror

Nov 8, 2025
शहरातील बाजारपेठेच्या विकासासाठी शिवसेनेची बांधिलकी -सचिन जाधव

माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव यांच्या पाठपुराव्याने काम मार्गी; नागरिक व व्यापाऱ्यांना दिलासा


शहरातील बाजारपेठेच्या विकासासाठी शिवसेनेची बांधिलकी -सचिन जाधव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील तेलीखुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे प्रारंभ करण्यात आले. माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव यांच्या पाठपुराव्याने सदर काम मार्गी लावण्यात आले असून, या रस्त्यामुळे बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या विकासकामाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, अकबर अली शेख, जुनेद शेख, बाबू मध्यान, राजेश चंगेडिया, शोएब शेख, एजाज शेख, शंकर कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.


सचिन जाधव म्हणाले की, शहरातील बाजारपेठेला जोडणारे रस्ते हे व्यापारी आणि ग्राहक वर्गाच्या सोयीसाठी अत्यंत आवश्‍यक आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करण्यात आली असून, महायुती सरकारच्या काळात नगरच्या विकासाला वेग आला आहे. शहरातील सर्व भागांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि स्वच्छता या सर्व क्षेत्रांत शिवसेनेचे प्रतिनिधी सक्रियपणे काम करत आहेत. विकास ही केवळ घोषणा नव्हे, तर कृतीतून दाखवलेली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.


तेलीखुंट येथील अंतर्गत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे कठीण झाले होते. पावसाळा संपताच या कामाला प्राधान्य देऊन नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.


अकबर अली शेख म्हणाले की, या रस्त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. बाहेरगावाहून खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना आता सहजपणे चांगल्या रस्त्यावरुन येता येणार आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा देखील उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने केवळ वाहतुकीची सुलभता नव्हे, तर परिसराचा देखील विकास होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. तर होत असलेल्या विकासकामाचे स्वागत केले. प्रलंबीत काम मार्गी लावल्याबद्दल माजी नगरसेविका अश्‍विनी जाधव यांचे आभार मानण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *