पंचक्रोशीतील ग्रामस्थांना धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील कामरगाव येथे सुरु असलेल्या नवनाथ ग्रंथ पारायणाची सांगता रविवारी (दि.1 सप्टेंबर) विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. कामरगावात महानुभाव वाडी, दत्त मंदिर येथे सुरु असलेल्या नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याप्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन मठाधिपती बापू मावली ठोकळ यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे कामरगाव मध्ये नवनाथ ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची समाप्ती रविवारी होणार असून, सकाळी 7 वाजता दत्त महाराजांची आरती व सकाळी 8:30 वाजता होमहवन आणि अभिषेक होणार आहे. भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादची सोय करण्यात आली आहे.