17 वर्षा आतील मुलींमध्ये पोदार व मुलांमध्ये 12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक व 14 वर्ष वयोगटात सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट, श्री साई संघ विजय मिळवून आघाडीवर
प्रवरा पब्लिक स्कूलचे खेळाडू जयवर्धन मानेदेशमुख याची गोलची डबल हॅट्रीक तर युवराज आहेरची हॅट्रीक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि.9 सप्टेंबर) 17 वर्षा आतील मुलींमध्ये पोदार स्कूल, 12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूलने व 14 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट व श्री साई संघाने विजय मिळवला. 16 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई स्कूलचा सामना शेवटच्या क्षणा पर्यंत रंगतदार ठरला. 2-2 गोलने हा सामना अनिर्णित राहिला. तर 12 वर्ष वयोगटातील प्रवरा पब्लिक स्कूलचे खेळाडू जयवर्धन मानेदेशमुख याने गोलची डबल हॅट्रीक तर युवराज आहेर ने हॅट्रीक केली.
सकाळच्या सत्रात 17 वर्षा आतील मुलींमध्ये पोदार स्कूल विरुध्द कर्नल परब मध्ये झालेल्या सामन्यात पोदार स्कूलने 6-0 गोलने एकतर्फी विजय संपादन केले. प्रतिपर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. यामध्ये जानवी लंघे हिने 4 व काव्या झावरे हिने 2 गोल केले.
प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्रीसाई स्कूलमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला होता. दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी केली. यामध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. हा सामना 0-0 गोलने अनिर्णित राहिला.
12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्रीसाई स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने आक्रमक खेळी करुन विक्रमी 12 गोल करुन एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूल कडून जयवर्धन मानेदेशमुख याने गोलची डबल हॅट्रीक तर युवराज आहेर याने हॅट्रीक केली. तसेच भीम कुंदन, श्लोक जाधव व श्रेयश डोईफोडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
14 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट विरुध्द द आयकॉन स्कूलमध्ये सामना रंगला होता. वेदांत देवकर इस्त्राएल आशिष सातराळकर यांनी प्रत्येकी 1 गोल करुन 2-0 गोलने सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट संघाला विजय मिळवून दिला.
दुपारच्या सत्रात 16 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट विरुध्द द आयकॉन स्कूलमध्ये अटातटीचा सामना रंगला होता. दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळी केली. शेवट पर्यंत दोन्ही संघाकडून गोल न झाल्याने 0-0 गोलने हा सामना अनिर्णित राहिला.
14 वर्ष वयोगटात (मुले) पोदार स्कूल विरुध्द श्री साई स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात अनिरुध्द नागपुरे याने शेवटच्या टप्प्यात 1 गोल करुन 0-1 गोलने श्री साई संघाला विजय मिळवून दिला.
16 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई स्कूलचा सामना शेवटच्या क्षणा पर्यंत रंगतदार ठरला. दोन्ही संघाची आक्रमक व बचावात्मक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. प्रवरा पब्लिक स्कूल कडून पवन वाणी व प्रदीप पॉल यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर श्री साई कडून स्वराज सूर्यवंशी व आदित्य वडेपेल्ली यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दोन्ही संघानी 2-2 गोलची बरोबरी साधून हा सामना बरोबरीत सुटला.
