• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

चाँद सुलतानाचे व्हाईस चेअरमन असगर सय्यद यांना समाज रत्न पुरस्कार

ByMirror

Sep 5, 2023

शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल चाँद सुलताना हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे व्हाईस चेअरमन असगर सय्यद यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.


शिक्षक दिनानिमित्त नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये घेण्यात आलेल्या काव्य संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात सय्यद यांना तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे व माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रा.डॉ. शंकर चव्हाण, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे, कोतवाली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक अश्‍विनी मोरे, कार्यक्रमाचे संयोजक पै. नाना डोंगरे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, उद्योजक बाळासाहेब शहाणे, श्रीरामपूरचे उत्पादन शुल्क निरीक्षक गोपाल चांदेकर, वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते. तर पुरस्कार मिळाल्याबद्दल सय्यद यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी देखील कौतुक केले.


अल्पसंख्यांक समाजातील मुला-मुलींना शिक्षण क्षेत्राच्या प्रवाहात आणण्यासाठी असगर सय्यद चाँद सुलताना हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून योगदान देत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे सातत्याने सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल त्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे चाँद सुलताना हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन मतीन सय्यद, समद खान, पप्पू जहागीरदार, हनिफ शेख, मुजाहिद (भा) कुरेशी, खालिद शेख, नवेद शेख, वहाब सय्यद, मौलाना शफी, मन्सूर सय्यद, नसीर शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *