• Mon. Jun 30th, 2025

शहरात संत रविदास महाराजांच्या मानाच्या दोन्ही दिंड्यांचे स्वागत

ByMirror

Jun 30, 2025

चर्मकार विकास संघाच्या वतीने दिंडी चालकांचा सन्मान


वारकऱ्यांच्या सेवाकार्यातून जीवनात ऊर्जा मिळते -संजय खामकर

नगर (प्रतिनिधी)- संत रविदास महाराज यांच्या मानाच्या दोन पायी दिंडीचे शहरात चर्मकार विकास संघाच्या वतीने भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात आलेल्या दिंडीने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.


संत रविदास महाराजांची त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर व टाकळीमिया ते पंढरपूर पायी दिंडी दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असती. या दिंडीचे अहिल्यानगर शहरातून प्रस्थान होत असताना चर्मकार विकास संघाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात येते. चर्मकार विकास संघाच्या मुख्य कार्यालय व लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे हा सोहळा पार पडला.


संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिंडीचे संचालक ह.भ.प. दत्तात्रय महाराज चिंधे, रामदास पठाडे, गणपत अभंग, उत्तम साबळे, ह.भ.प. जनार्दन सूर्यवंशी यांचा सत्कार करुन दिंडीसाठी आर्थिक मदत दिली. यावेळी संतोष कानडे, अरुण गाडेकर, विनोद कांबळे, रुपेश लोखंडे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, अशोक आंबेडकर, सुरेश शेवाळे, मिनलताई माने, सूर्यभान शिंदे, अशोक पोटे, मनिष कांबळे, संतोष जाधव, वसंत देशमुख, विक्रम गुजर, मनीष जतकर, दिनेश देवरे, प्रशांत रोझतकर, अजय सातपुते, नानासाहेब शिंदे, पाराजी साळे, महादेव सोनवणे, सुहास दुर्गे, बाळासाहेब देशमुख, नंदू गायकवाड, सचिन नन्नवरे, माणिक लव्हाळे, भानुदास नन्नावरे, भिकाजी वाघ, ज्ञानेश्‍वर वाघमारे, किसन पाचरणे, भगवान काजळकर, महेश काजळकर, विकास धस, सोमनाथ भगुरे, भोलेनाथ तेलोरे, संतोष कदम, बाळासाहेब कदम, दिलीप तावरे, संजय सुरंजे, किसन बागडे, संदीप सोनवणे, आशाताई गायकवाड, लक्ष्मीताई दुर्गे, चांगदेव शेंडे, मच्छिंद्र हिरे, नवनाथ पोटे मोठ्या वारकरी भक्त उपस्थित होते.


संजय खामकर म्हणाले की, वारकऱ्यांच्या सेवेत पांडूरंगाचे दर्शन होते. या सेवाकार्यातून जीवनात एक ऊर्जा मिळते. दिंडीतील वारकरी संत रविदास महाराजांचे विचार सर्वत्र पोहचविण्याचे कार्य या दिंडीतून करत असल्याची भावना व्यक्त केली.


त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर दिंडी शहरात दोन दिवस तर टाकळीमिया ते पंढरपूर दिंडी एक दिवस मुक्कामास असते. या दिंडीच्या स्वागत व दर्शनासाठी शहरातील सर्व चर्मकार समाज बांधव देखील उपस्थित होते. यावेळी अभंग, किर्तन व हरिपाठाचा भक्तीमय कार्यक्रम रंगला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *