• Tue. Jul 22nd, 2025

शहरात भरतनाट्यमचा मार्गम नृत्य कलाविष्कार उत्साहात

ByMirror

Jan 9, 2024

द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेचे सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या भरतनाट्यम मार्गम आणि द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यमच्या नृत्य कलाविष्काराचा सोहळा रंगला होता. नगर-कल्याण रोड येथील राधिका भरतनाट्यम अकॅडमी, जय माता दी सार्वजनिक वाचनालय व श्री बालाजी हेल्थ केअरच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास कलारसिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा डावरे, नृत्य तपस्वी वर्षा पंडित, नृत्य गुरू आश्‍लेषा पोतदार, अपर्णा थत्ते, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, अकॅडमीच्या संचालिका कविता भांबरे-घोलप, पोलीस उप अधीक्षक (गृह) हरिष खेडकर, जि.प. सोसायटी व्यवस्थापक राजेंद्र पवार, पंडितराव हराळ गुरु, नृत्य तपस्वी वर्षा पंडित, लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद रमेश कासार, सेफ ट्री इंडस्ट्रिज चेअरमन परशुराम कोतकर, प्रविण शेरकर, अश्‍विनी मोरे, रामभाऊ नळकांडे, युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे, भगवानराव काटे, विनायक आडेप, सुधीर शेटे, भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर, आश्‍लेषा पोतदार, संगिता दसासे, पारुनाथ ढोकळे, सुरेखा ढोकळे आदी उपस्थित होते.


संचालिका कविता भांबरे-घोलप म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या भरतनाट्यम कला जोपासण्याचे काम केले जात आहे. बारा वर्षापासून विद्यार्थ्यांसह युवक-युवतींना नृत्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण कथेवर आधारित नृत्य नाटिका सादर केली. तसेच भरतनाट्यम्‌ मार्गम अंतर्गत रचना सादर करण्यात आल्या. पुष्पांजली, अलारीपु, नटेश कौत्वम, तिल्लाना तसेच शास्त्रीय नृत्यावर आधारीत चित्रपट नृत्यगीते सादर करण्यात आली. गार्गी अनभूले, हिमानी बोरुडे, श्रेया शिंदे, अनुष्का चोभे, रीवा राऊत, समीक्षा गुंजाळ, समीक्षा गुंजाळ, समीक्षा खांदवे, ओवी गायकवाड, रीतिशा कोरडे, आराध्या कवाष्टे, स्वरा जाधव, वेदांगी बोराडे, संतानिका लोडे, प्रगती अगरवाल, ईशिका भागवत, वेदिका गावडे, प्रणाली रसाळ, ईश्‍वरी कवाष्टे, सिद्धी आडेप, प्रचिती शिंदे, तनिष्का दळवी, रेणुका शिंदे, मृणालिनी शेरकर, आराध्या बुरा, अनुश्री शिंदे, शरण्या बकाल, गौरी तीकोने, कृष्णा लगड ,सिध्दी गांधी, तुलसी ओस्तवाल, वैष्णवी पवार, पृथ्वी सुपेकर, शिवानी सुपेकर, प्रांजल शिंदे, सान्वी तायडे, रोशनी भांबरे यांनी या नृत्याविष्कारात सहभाग घेतला.


या कार्यक्रमात कलाकारांचे कौतुक म्हणून अनेकांनी रोख स्वरूपात बक्षीसं दिली. सखाराम मोटे, प्रा. दिगंबर अहिरे, आनंद घोडके, वेदांत जमदाडे यांच्या पदोन्नती व उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी कलाकारांचा नृत्य तपस्वी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारुनाथ ढोकळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नयना तायडे यांनी केले. आभार संतोषराव दसासे पाटील यांनी मानले.


संगीत नियोजन सागर चव्हाण, छायाचित्रण शिवानद भांगरे, रंगमंच व्यवस्था जालिंदर शिंदे, सन्मानचिन्ह सुनील जोर्वेकर, सहायक आर्किटेक्ट तुषार, मंदार फुलारी आणि भांबरे परिवाराचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *