• Tue. Jul 1st, 2025

वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वडाचे वृक्षारोपण

ByMirror

Jun 12, 2025

महिला पोलीस, लोकप्रतिनिधी आणि एकल महिलांचा सहभाग; कृष्णाली फाऊंडेशनचा आगळावेगळा उपक्रम

वटपौर्णिमेला सामाजिक भानाची जोड

नगर (प्रतिनिधी)- सुवासिनींच्या सौभाग्याचा सण मानल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त कृष्णाली फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गणेशनगर येथे एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये महिला पोलीस अधिकारी, स्थानिक महिला नगरसेविका तसेच एकल महिलांच्या हस्ते वडाचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासह सांस्कृतिक परंपरेला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देण्यात आली.


वड हे भारतीय संस्कृतीत धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत पूजनीय आणि उपयुक्त झाड मानले जाते. त्याचा ऑक्सिजन पुरवठा करण्याचा गुण, आणि स्त्रियांनी आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करण्याची परंपरा, याचे महत्त्व अधोरेखित करत कृष्णाली फाऊंडेशनने महिलांच्या हाताने वडाचे झाड लावण्याचा उपक्रम राबवला.
वटपौर्णिमा हा सुवासिनीचा सन मानला जातो परंतु कृष्णाली फाऊंडेशन या ठिकाणी एकल महिलांना मान सन्मान दिला आणि त्यांच्या हाताने देखील वडाचे झाडाचे रोपण केले, या सामाजिक कार्यक्रमात जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.


या कार्यक्रमासाठी कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, माजी महापौर रोहिणीताई शेडगे, पीएसआय शितल मुंगडे, प्रियंका पाटील शेळके, हेड कॉन्स्टेबल वैशाली पठाडे, पोलीस नाईक योगिता साळवे, कॉन्स्टेबल सोनाली भागवत, माजी नगरसेविका वैशाली नळकांडे, सविता शिंदे, जयश्री देवतरसे, गणेशनगर सोसायटीचे उपाध्यक्ष गायत्री सतीश बागडे, आशा शेळके, ताराबाई शिंदे, साधना गरड, शुभांगी भगने, भारती कोमकुल, जयश्री सोनवणे, सुवर्णा इरोळे, ज्योती रासकर, कामिनी बोराडे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


मान्यवरांचा गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले, यावेळी अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे, राज ठाणगे, गणेश शिंदे गणेशनगर सोसायटी चेअरमन उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *