रायगड तरुण मंडळ ट्रस्ट व रायगड रणरागिनी नवरात्र उत्सव महिला समितीचेी रंगली मिरवणुक; पारंपारिक वाद्यांचा गजर
नवरात्र उत्सव स्त्री शक्तीचे प्रतिक -आश्विनीताई जाधव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळ ट्रस्ट व रायगड रणरागिनी नवरात्र उत्सव महिला समितीच्या वतीने भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीचा जयघोष करुन महिलांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना करण्यात आली. परिसरातील सर्व महिला व युवती वर्गाने या उत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आदिशक्तीचा जागर केला.
नगरसेविका आश्विनीताई जाधव यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. शिवसेनेचे शहर प्रमुख तथा मंडळाचे मार्गदर्शक सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक ढोल पथकाच्या वादनात मंगलगेट परिसरातून देवीची मिरवणुक काढण्यात आली होती. तुळजा भवानी मातेच्या जय घोष करुन पारंपारिक वाद्यांचा गजर यावेळी करण्यात आला.
नवरात्रीच्या प्रारंभी रंगलेल्या सोहळ्यात लक्ष्मी साळुंखे, यमुना शिंगटे, जयश्री थोरात, कांचन रामनाणी, रत्ना मर्दाने, जयश्री जाधव, अंबिका गवळी, उषा शिंगटे, पायल मुंडलिक, श्रुती साळुंके, किरण जाधव, जयश्री थोरात, मनीषा शिंगटे, सुभद्रा मुंडलिक, सुवर्णा साळुंके, मंजुषा मर्दाने, जिया रामनाणी, आशा थोरात, जयश्री गवळी, कांता गवळी, सुरेखा गवळी, ललिता साळुंखे, बेबी थोरात, अनिता साळवे, माधुरी थोरात, रंजना दरक, कविता धुपधरे, वैष्णवी धुपधरे, शांभवी मुंडलिक, जयश्री गवळी, पूर्वा गवळी, आराध्या थोरात, आरोही थोरात, मोक्षदा जाधव, अनिता साळवे, शुभ्रा क्षीरसागर, सेजल गवळी, प्रांजल गवळी, त्रिशुल्या क्षीरसागर, आदिती थोरात, दिपाली थोरात, उमा पाचेगावकर, जया सिद्ध, शिल्पा जाधव, कासटभाभी, इंदुबाई गवळी, अमृता क्षीरसागर, सुरेखा गवळी, कल्पना शिंगटे, सुनीता गवळी, मनीषा देशमुख, रोहिणी धुपधर, अर्चना गवळी, ज्योती गवळी, रोहिणी शिंगटे, हेमलता देवकर, सुरेखा शेटे, मीना थोरात, भारती गवळी, पुष्पा शेटे, द्वारिका साळवे, इशा गोयल, सूरपुरीया भाभी आदींसह नवरात्र महीला महोत्सव समितीच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आश्विनीताई जाधव म्हणाल्या की, नवरात्र उत्सवाचा मोठा उत्साह महिलांमध्ये दिसून येतो. नवरात्र उत्सव स्त्री शक्तीचे प्रतिक असून, महिलांसाठी पर्वणी असलेला हा उत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. दरवर्षी सर्व महिलांना एकत्रित करुन नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव समितीच्या वतीने राबविण्यात येतात. महिला शक्तीचा जागर या नवरात्र उत्सवातून केला जात असल्याचे त्या म्हणाल्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रायगड तरुण मंडळ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
