डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने देवीला साडी-चोळी अर्पण
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जगदंबा मातेच्या मंदिरात विजयादशमीला नवरात्रोत्सवानिमित्त पार पडलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता विधीवत होम-हवनाने झाली. यावेळी स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने देवीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अनिल फलके, दिपक जाधव, विमल रासकर, डॉ. विजय जाधव, गोरख फलके, कुमार फलके, अरुण कापसे, शिवाजी जाधव, कचरु कापसे, देवाचे भगत नामदेव भुसारे, भाऊसाहेब कापसे, लालू शिंदे, संदीप डोंगरे, भरत बोडखे, मंदाताई डोंगरे, नामदेव फलके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरोहित विजय गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली होम-हवन पार पडले. नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी बिरोबा व खंडोबाच्या काठिची मिरवणुक रंगली होती.