• Thu. Oct 16th, 2025

आरिश शेख याचा रमजानचा पहिला रोजा

ByMirror

Mar 15, 2025

नगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील आरिश साजिद शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे.


पहाटे त्याने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्याने निर्जली रोजा ठेवला होता. आरिश हा ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजू शेख यांचा नातू व वृत्त छायाचित्रकार साजिद शेख यांचा चिरंजीव आहे. तो इयत्ता दुसरी मध्ये अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने केलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्याचे कौतुक करुन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *