पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 20 जानेवारी रोजी या सोहळ्याचे प्रमुख संत महंत वारकरी परिसरातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ होणार आहे. या धार्मिक सोहळ्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक तथा निमंत्रक नवनाथभाऊ दहिवाळ, देवराव ढाकणे, गंगाधर ढाकणे व भगवानगड परिसरातील वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी कलश व विना पूजन केले जाणार आहे. तर दुपारी ह.भ.प. हरी महाराज राऊत (मिडसांगवी), ह.भ.प. संतोषानंद महाराज भारती (मुंगूसवाडे) यांचे प्रवचन होणार आहे. रात्री ह.भ.प. मौनानंदजी महाराज (परभणी) यांचे किर्तन होणार आहे. रविवारी 22 जानेवारी रोजी ह.भ.प. जनार्दन महाराज माळवदे (अहमदनगर), ह.भ.प. बबन महाराज राठोड (दुर्गाशक्ती तांडा) यांचे प्रवचन होणार आहे. तर रात्री ह.भ.प. जगन्नाथ महाराज शास्त्री (कोरेगाव) यांचे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर पहाटे काकड आरती, सकाळी गाथा भजन, रामायण, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. बाबासाहेब महाराज खेडकर व रामायणाचे निरूपण ह.भ.प. संतोषनंद महाराज करणार आहे.
सोमवारी (दि.22 जानेवारी) सकाळी ह.भ.प. विवेकानंद महाराज शास्त्री (भगवानगड) यांचे काल्याचे किर्तनाने या सोहळ्याचा समारोप होणार असून, दहिवाळ सराफच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अंबादास घुले, नागनाथ फोटो स्टुडिओ, आदिनाथ जायभाये, दिनकर ढाकणे, प्रवीण दहिवाळ, सचिन खेडकर देवराव ढाकणे, गंगाधर ढाकणे, लिंबाजी खेडकर, माळेगाव, पारगाव, मालेवाडी, भारजवाडी, तुळजवाडी, काटे वाडी, ढगेवाडी,मालेवाडी, मुंगूसवाडी, कीर्तन वाडी, श्रीपतवाडी, काटेवाडी, तुळजवाडी, टेंभुर्णी, येळी, फुंदे टाकळी, निंबादैत्य नांदूर, श्री क्षेत्र भगवानगड परिसरातील भाविक सहकार्य करत आहे. या सप्ताहाची सांगता सोमवारी (दि. 22 जानेवारी) काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तर आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव देखील साजरा केला जाणार आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे नवनाथभाऊ दहिवाळ खरवंडीकर यांनी सांगितले आहे.
भारती महाराज, राऊत महाराज, विवेकानंद शास्त्री महाराज, बबन महाराज, जगन्नाथ महाराज, शास्त्री महाराज, तपस्वी मौनानंदजी महाराज, हरी महाराज राऊत, बबन महाराज राठोड आदी महाराजांचे भजन कीर्तन होणार आहे. तसेच संतोषनंद महाराज राम कथा सांगणार आहे.