• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात

ByMirror

Oct 14, 2023

हजार पेक्षा जास्त शालेय खेळाडूंचा सहभाग

खेळ जीवनात आनंद निर्माण करतो – महावीरसिंग चौहान

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थीदशेत शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ आनंद निर्माण करतो. तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मैदानी खेळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे मप्रतिपादन राहुरी कृषी विद्यापिठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी महावीरसिंग चौहान यांनी केले.


क्रीडा युवक सेवा संचानलाय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व ॲथलेटीक्स असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चौहान बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, ज्ञानेश्‍वर खुरांगे, अजय पवार, सुधीर चपळगावकर, विशाल गर्जे, जिल्हा ॲथलेटिक्स असोशिएशनचे सचिव दिनेश भालेराव, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, अजित वडवकर, बापूराव होळकर, रमेश वाघमारे, रमेश दळे, सुजित बाबर, राहूल काळे, संतोष ठाणगे, संदीप घावटे, राघवेंद्र धनलगडे, महादेव साबळे, अमित चव्हाण, गुलजार शेख, नेहा मोरे, साक्षी मोरे, अनिकेत कोळगे, करण काळे, जगन गंवादे, रावसाहेब मोरकर, श्रीरामसेतू आवारी, समीर शेख, यशवंत पानमळकर, प्रविण हिकरे आदी उपस्थित होते.


यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते सुनिल जाधव, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना व्यायाम व आहाराचे महत्त्व सांगितले. 13 व 14 ऑक्टोबर रोजी मैदानी स्पर्धा वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये पार पडल्या. यामध्ये एक हजार पेक्षा जास्त शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.

14, 17 व 19 वयोगटातील मुला-मुलींच्या धावणे, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, रिले, तिहेरी उडी, बांबु उडी, भालाफेक, हॅमर थ्रो, क्रॉस कंट्री आदी स्पर्धा पार पडल्या.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *