• Sun. Jul 20th, 2025

अहमदनगर जिल्ह्याचा मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

ByMirror

Mar 2, 2024

राज्यस्तरीय सब ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेसाठी खेळाडू रवाना

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. नुकतेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धा भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली.


या निवड चाचणीतून खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली असून, वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जळगावमध्ये होणाऱ्या सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मुलींचा संघ रवाना झाला आहे. जिल्ह्याच्या संघात तनिष्का पाटील, अमृता सातपुते, आर्या महातेकर, स्वरा हिंगे, रिदा शेख, नंदिनी होळकर, पायल शिंदे, ऋतुजा गर्जे, जिज्ञासा दळवी, विद्या बडे, वंशिका संघराजका, शहेझीन शेख, भाग्यश्री उबाळे, स्वरा गंभीरे, आराध्या लांडे, एंजल वनारसे, अक्षरा गर्जे, सिया अडसुर या खेळाडूंचा समावेश आहे.


अहमदनगर जिल्ह्याचा सोमवारी (दि.4 मार्च) पहिला सामना यवतमाळ विरुद्ध रंगणार आहे. फुटबॉल स्पर्धेसाठी मुलींच्या जिल्ह्याचा संघ उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव विक्टर जोसेफ, सदस्य जेव्हिअर स्वामी व पल्लवी सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आला असल्याची माहिती प्रशिक्षक जॉय जोसेफ यांनी दिली.


प्रशिक्षक म्हणून पल्लवी सैंदाणे आणि संघ व्यवस्थापक म्हणून प्रियंका आवारे संघासोबत जात आहेत. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव रोनप ॲलेक्स फर्नांडिस, रिशपालसिंग परमार, जोगसिंह मिनहास यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *