• Tue. Oct 14th, 2025

अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अंडर-15 फुटबॉल निवड चाचणी जाहीर

ByMirror

Oct 10, 2025

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन, निवड झालेले खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने जिल्हा अंडर-15 (15 वर्षाखालील) मुले व मुलींच्या फुटबॉल संघ निवड चाचण्यांची घोषणा करण्यात आली आहे. 2025-26 हंगामासाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची ही सुवर्णसंधी असून, सर्व पात्र खेळाडूंनी या निवड चाचण्यांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


या निवड चाचण्या सोमवार, दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजल्यापासून सुरु होतील. मुलांची चाचणी भुईकोट किल्ला, अहमदनगर क्लबजवळील फोर्ट ग्राउंडवर तर मुलींची चाचणी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशिक्षक व निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत चाचण्या पार पडणार आहेत.


या निवड चाचणीत 2011 किंवा 2012 साली जन्मलेले मुले-मुली सहभागी होऊ शकतात. सहभागी खेळाडूंनी मूळ जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत आणणे आवश्‍यक आहे. यापैकी किमान एक कागदपत्र अहिल्यानगर जिल्ह्यातील असणे आवश्‍यक आहे.


जिल्ह्याबाहेरील खेळाडूंसाठी विशेष नियम लागू राहणार आहेत. ज्या खेळाडूंचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यात झालेला नाही आणि ज्यांचे आधार कार्ड देखील जिल्ह्याबाहेरील आहे, अशा खेळाडूंची नोंद सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टमवर एडीएफए संलग्न क्लबमार्फत 24 जुलै 2025 पूर्वी झालेली असावी. ही अट स्पर्धा सुरु होण्याच्या किमान 90 दिवस आधीची असणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रौनप फर्नांडिस यांनी सांगितले आहे.


निवड चाचणीत पात्र ठरलेल्या खेळाडूंचा अधिकृत जिल्हा फुटबॉल संघ तयार होणार असून, या संघाची राज्यस्तरीय स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून सुरु होईल. संघाची तयारी व प्रशिक्षण सत्र याबाबत पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडूंनी प्रदीप जाधव 9422227599 व राजू पाटोळे 9657538868 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *