• Wed. Oct 15th, 2025

महाराष्ट्र सब-ज्युनियर फुटबॉल प्रशिक्षण शिबिरासाठी अहिल्यानगरच्या खेळाडूंची निवड

ByMirror

Oct 3, 2025

सम्राट आव्हाड व आयुष गाडळकर यांचा समावेश

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सब-ज्युनियर संघातील खेळाडू सम्राट राजकुमार आव्हाड व आयुष महेंद्र गाडळकर यांची महाराष्ट्र सब-ज्युनियर प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. हे शिबिर मुंबई येथे दि. 7 ते 26 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.


ही निवड मे 2025 मध्ये शिरपूर, धुळे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब-ज्युनियर बॉईज फुटबॉल स्पर्धा 2024-25 मधील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे झाली आहे. या शिबिरातून अंतिम संघात निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असून, सब-ज्युनियर बॉईज राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 अमृतसर, पंजाब येथे दि. 28 ऑक्टोबर पासून आयोजित करण्यात आली आहे.


या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंग मिन्हास, अमरजितसिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंग परमार, राजू पाटोळे, जिल्हा सब-ज्युनियर बॉईज संघ प्रशिक्षक अभिषेक सोनावणे, संघ व्यवस्थापक रोहन कुकरेजा व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन करुन, त्यांना पुढील प्रशिक्षण व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


मागील वर्षभरात प्रत्येक वयोगटात जिल्ह्यातील खेळाडूंची सातत्याने राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली असून, त्यापैकी 7 खेळाडूंनी अंतिम संघात स्थान मिळवून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, जिल्ह्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी जिल्हा फुटबॉल संघटना योग्य दिशेने वाटचाल करत असल्याची भावना जिल्हा संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *