अमरावती येथे होणार कुमार राज्य वॉटर पोलो स्पर्धा
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा वॉटर पोलो संघाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अमरावती येथे होणाऱ्या कुमार राज्य वॉटर पोलो स्पर्धेसाठी हा संघ खेळणार आहे.
लवकरच अमरावती येथे होत असलेल्या राज्य वॉटर पोलो स्पर्धेसाठी विखे पाटील सैनिक स्कूल जलतरण तलाव लोणी येथे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून संघाची निवड सचिव रावसाहेब बाबर यांनी जाहीर केली आहे. निवड समितीमध्ये क्षितिज बाबर, प्रणित ढोकळे, ओंकार ढमाले यांचा समावेश होता.
अहिल्यानगर जिल्हा वॉटर पोलो संघामध्ये कर्णधार आर्यन धायतडक, सार्थक सरोदे, सार्थक इंडायक, तेजस पवार, गौरंग गवानकर, राजवर्धन पाटील, विर उनवणे, रणवीजय घोरपडे, आर्कम शेख, कौस्तुभ चिवटे, प्रयागराज पवार, अर्णव पळशीकर, श्रेय गांधी व राखिव खेळाडू म्हणून जीत लाड, साईराम जाधव यांचा समावेश आहे.
संघाचे व्यवस्थापक म्हणून अकिल शेख व मार्गदर्शक योगिता तनपुरे जबाबदारी सांभाळत आहे. होणाऱ्या स्पर्धेसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण व विश्वजीत चव्हाण यांनी जिल्ह्याच्या संघाला शुभेच्छा दिल्या.