राष्ट्रीय धर्मगुरु पदवी प्रदान
मुरबाडच्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये झाला सन्मान
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे मठाधिपती अशोक (दादा) जाधव यांना विश्वसन्मान जीवन गौरव महासन्मान पुरस्कार व तसेच राष्ट्रीय धर्मगुरु पद प्रदान करण्यात आले. श्री क्षेत्र संगमेश्वर, ता. मुरबाड (जि. ठाणे) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये 111 साधू संत महंताच्या उपस्थितीमध्ये जाधव यांचा सन्मान झाला.
प.पू. अशोक (दादा) जाधव यांच्या धार्मिक, अध्यात्म सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल बुऱ्हाणनगर येथील सेवेकरी मित्र परिवार तर्फे त्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. यावेळी अनापवाडी शाळेचे मुख्याध्यापक सागर घोलप, बाळासाहेब रासकर, कृष्णा उरणकर, नानासाहेब कर्डीले, विशाल पवार उपस्थित होते. तसेच सर्व शंकर महाराज सेवेकरी यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
