• Fri. Aug 1st, 2025

नवनागापूरच्या श्री रेणुका माता मंदिरात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

ByMirror

Oct 11, 2024

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

सुरक्षितेच्या दृष्टीकोनाने व नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबद्दल देवस्थानचे कौतुक

नगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) संध्याकाळी देवीची आरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.


तसेच मंदिरास अप्पर पोलीस अधीक्ष प्रशांत खैरे, धर्मदाय उपायुक्त यू.एस. पाटील यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. आलेल्या पाहुण्यांचे देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर उपस्थित होते.


रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनाने व नियोजनाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी माहिती घेऊन ट्रस्टचे कौतुक केले. मंदिरा समोरील मैदानाता विविध पाळणे थाटले असून, भाविकांसह बालगोपाळ या पाळण्याचा आनंद घेत आहे. तर विविधे खाद्य पदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळण्यांचे व महिलांच्या विविध साहित्यांचे स्टॉलने परिसर गजबजला आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे.


पंचक्रोशीतील हजारो भाविक दररोज दर्शनाला हजेरी लावत असून, महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून दर्शनासाठी महिला-पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मंदिर परिसरात संपूर्ण पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आणि देवस्थानच्या वतीने महिला व पुरुष सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, या संपूर्ण चित्रीकरणावर रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *