उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल येथे नुकतीच जिल्हास्तरीय ‘फनलँड कार्निव्हल’ एकल नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत कु. आराध्या दिवटे हिने आपल्या उत्कृष्ट नृत्य सादरीकरणाच्या जोरावर 5 ते 10 वर्षे वयोगटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून यश संपादन केले.
स्पर्धेदरम्यान आराध्या हिने उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण केले. तिच्या कलेला परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. या यशाबद्दल तिला नृत्य दिग्दर्शिका श्रृतिका ढाकणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आराध्या दिवटे बाई इचरजबाई प्रशालेत इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे. या यशासाठी महादेव भद्रे, प्रा. डॉ. अनिता भद्रेदिवटे, नृत्य प्रशिक्षक सौरभ सर, तसेच तिच्या वर्गशिक्षिका रोहिणी पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा छायाताई फिरोदिया, बाई इचरजबाई प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया, तसेच प्रसिद्ध नृत्यप्रशिक्षिका सुरेखा डावरे यांनी तिचे अभिनंदन केले. या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
