• Thu. Mar 13th, 2025

सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकाविली अर्धा किलो सोन्याची गदा

ByMirror

Apr 24, 2023

राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा

2024 च्या निवडणुकीत पुन्हा नशा करणार्‍या पैलवानांचा पराभव करून विजय मिळविणार -देवेंद्र फडणवीस

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेत बक्षिसाचे खास आकर्षण असलेली अर्धा किलो सोन्याच्या गदेचा मानकरी सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला. या स्पर्धेतील अंतिम निकाली कुस्ती महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) विरुध्द महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात झाली. कुस्ती खेळताना शिवराज राक्षे याच्या पायाला दुखापत झाल्याने महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्धा किलो सोन्याची गदा गायकवाडला बक्षीस म्हणून देण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आ. प्रा. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी सिध्दराम साळीमठ, हिंद केसरी योगेश दोडके, अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समिती अध्यक्ष संजय सिंग, स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा, सचिन पारखी, बाबुशेठ टायरवाले, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, अ‍ॅड. धनंजय जाधव, आकाश कातोरे, मदन आढाव, विक्रम राठोड, पै. नाना डोंगरे, संग्राम शेळके, प्रताप चिंधे, मोहन हिरनवाळे, महेश लोंढे, बाळासाहेब भुजबळ, नितीन शेलार, आकाश कातोरे, मदन आढाव, ओंकार सातपुते, पै. अनिल गुंजाळ, पै. सुभाष लोंढे, अजय आजबे, मेघराज कटके, संभाजी निकाळजे, हंगेश्‍वर धायगुडे, ओंकार शिंदे आदींसह भाजप, शिवसेना व जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुस्ती खेळाला सर्वात प्रथम छत्रपती शिवरायांनी प्रोत्साहन दिले. यानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या काळात तालीम बांधल्या व या खेळाला चालना दिली. हाच वारसा या स्पर्धेतून पुढे नेण्यात आला आहे. शाहू महाराजांनी विजेत्या मल्लांना चांदीची गदा देण्याची परंपरा निर्माण केली व आता कुस्ती मल्लांना सोन्याची गदा देण्याची नवीन परंपरा सुरू झाली असल्याचे सांगितले.


कुस्तीने भारताला ऑलम्पिक मधील पहिले पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. यानंतर दुर्दैवाने पदक मिळाले नाही, ते पदक परत मिळवण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मातीतून कुस्तीतील ऑलम्पिक विजेता तयार होण्यासाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाचे उत्तम प्रकारे कार्य सुरू असल्याचे कौतुक केले. मुख्यमंत्री असताना पैलवानांच्या मानधनात व बक्षिसांच्या रकमेत वाढवाढ केली. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तीनदा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना डीवायएसपीची नोकरी देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी वाडियापार्कला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल निर्माण करण्याची मागणी केली असता, फडणवीस यांनी स्टेडियमचा प्रस्ताव तयार करा राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला मान्यता देण्याचे काम केले जाणार असल्याचे जाहीर केले. तर राजकारणावर बोलताना सकाळी नऊ वाजता नशा करून राजकीय आखाड्यातील पैलवान कुस्ती करत आहे. नशा करणार्‍या पैलवानांना पराभव करुन मातीतील पैलवान जिंकत आहे. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा नशा करणार्‍या पैलवानांचा पराभव करून विजय मिळविणार, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


स्वागत अध्यक्ष राम शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुस्ती स्पर्धेमुळे कुस्ती प्रेमींना उत्तम पर्वणी मिळाली. शहरातील वाडियापार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल करण्याची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. सचिन जाधव यांनी स्वागत केले. अभय आगरकर यांनी कुस्तीला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची मागणी केली. वसंत लोढा यांनी शहराची वाईट अवस्था असून, शहर विकासासाठी निधी चांगले प्रशासन देण्याचे स्पष्ट केले.


86 किलो वजनगट ते 135 किलो खुल्या वजनगटात उपांत्य फेरीची कुस्ती गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे (पुणे) यांच्यात झाली. यामध्ये शिवराज राक्षे याने उकृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 12 गुणांची कमाई केली. कोकाटे याला 2 गुण मिळाले. 10 गुणांच्या फरकाने राक्षे विजयी ठरला. अनेकांचे लक्ष लागून असलेल्या माती विभागाच्या उपांत्य फेरीतील सिकंदर शेख (वाशिम) विरुध्द महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात अत्यंत अटातटीची लढत प्रेक्षकांना पहावयास मिळाली. शेख याने गुणांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात गायकवाड याने गुणांची कमाई करुन 4-3 ने शेख याला पराभूत केले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आगमन झाले. फडणवीस यांचे शिवसेना, भाजप, जिल्हा तालीम संघ व स्व. अनिल राठोड परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कलाकारांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन उपांत्य फेरीत विजयी ठरलेले मल्ल शिवराज राक्षे (पुणे) विरुध्द महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात सोन्याच्या गदेसाठी अंतिम कुस्ती लावण्यात आली. ही कुस्ती रंगात आली असताना राक्षे याच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमध्ये राक्षे याने पुढील खेळ खेळण्यास असमर्थता दर्शविल्याने गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले.

मागील दोन दिवसापासून सकाळ व संध्याकाळ कुस्ती स्पर्धेचा थरार सुरु होता. रविवारी सकाळी विविध वजन गटातील अंतिम कुस्त्या पार पडल्या. फक्त ओपन गटातील उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्य दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. वाडियापार्क क्रीडा संकुल प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गच्च भरले होते. बोल बजरंग बली की जय! चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपविजयी मल्ल शिवराज राक्षे याला 2 लाख व तृतीय विजेते ठरलेले गादी व माती विभागातील सिकंदर शेख, माऊली कोकाटे (पुणे) यांना प्रत्येकी 50 हजार देण्यात आले. विविध वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना अनुक्रमे 1 लाख, पन्नास हजार व तीस हजार रुपये तसेच 79, 86 किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना 1 लाख 25 हजार, 75 हजार व 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तर सुभाष लोंढे व संभाजी लोंढे यांच्या वतीने विजेत्यांना आकर्षक स्व.पै. छबुराव लांडगे यांच्या मुर्तीचे चषक देण्यात आले.

माती विभाग अंतिम निकाल:-
48 किलो वजनगट : प्रथम- अजय निंबाळकर (सोलापूर), द्वितीय- समीर खंडगीर (अहमदनगर), तृतीय- गहिनीनाथ शिर्के (बीड).
57 किलो वजनगट : प्रथम- सुरज अस्वले (कोल्हापूर), द्वितीय- अतुल चेचर (कोल्हापूर), तृतीय- संग्राम जगताप (पुणे).
61 किलो वजनगट : प्रथम- ज्योतीबा अटकळे (सोलापूर), द्वितीय- विजय पाटील (कोल्हापूर), तृतीय- विजय डोंगरे (सोलापूर).
65 किलो वजनगट : प्रथम- आबा अटकळे (सोलापूर), द्वितीय- पंकज पाटील (सांगली), तृतीय- सुरज कोकाटे (पुणे).
70 किलो वजनगट : प्रथम- सोनबा गोंगाणे (कोल्हापूर), द्वितीय- निखील कदम (पुणे), तृतीय- सद्दाम शेख (कोल्हापूर).
74 किलो वजनगट : प्रथम- अनिल कचरे (पुणे), द्वितीय- अक्षय चव्हाण (पुणे), तृतीय- जतीन आव्हाळे (धुळे).
79 किलो वजनगट : प्रथम- प्रकाश काळे (सोलापूर), द्वितीय- अविनाश शिंदे (बीड), तृतीय- महादेव कचरे (सोलापूर).

86 किलो वजनगट : प्रथम- कौतुक डाफळे (कोल्हापूर), द्वितीय- चंद्रशेखर गवळी (धुळे), तृतीय- राहुल काळे (सोलापूर).

गादी विभाग अंतिम निकाल:-
48 किलो वजनगट : प्रथम- अभिजीत ठाणगे (अहमदनगर), द्वितीय- लक्ष्मण चव्हाण (हिंगोली), तृतीय- हर्षवर्धन जाधव (कोल्हापूर).
57 किलो वजनगट : प्रथम- अतीश तोडकर (बीड), द्वितीय- रमेश इंगवळे (कोल्हापूर), तृतीय- स्वप्निल शेलार (पुणे).
61 किलो वजनगट : प्रथम- योगेश्‍वर तापकिर (पिंपरी चिंचवड), द्वितीय- सौरभ इंगळे (सोलापूर), तृतीय- भरत पाटील (कोल्हापूर).
65 किलो वजनगट : प्रथम- सुमितकुमार भारस्कर (बीड), द्वितीय- विक्रम कुर्‍हाडे (कोल्हापूर), तृतीय- प्रदीप सुळ (सातारा).
70 किलो वजनगट : प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर), द्वितीय- विनायक गुरव (कोल्हापूर), तृतीय- शुभम पाटील (कोल्हापूर).
74 किलो वजनगट : प्रथम- राकेश तांदुळकर (कोल्हापूर), द्वितीय- शुभम थोरात (पुणे), तृतीय- करण फुलमाळी (अहमदनगर).
79 किलो वजनगट : प्रथम- शुभम मगर (सोलापूर), द्वितीय- अक्षय घोडके (अहमदनगर), तृतीय- गौतम शिंदे (सोलापूर).

86 किलो वजनगट : प्रथम- कालीचरण सोलानकर (सोलापूर), द्वितीय- विजय सुसरे (नाशिक), तृतीय- पांडुरंग पारेकर (पुणे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *