• Fri. Jan 30th, 2026

गीताभारताला उन्नत चेतनेची विश्‍वगंगा घोषित

ByMirror

Feb 7, 2023

समाजातील शोषक, तमस प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार

संविधानाला गीताभारताची जोड दिल्यास देशात उन्नत चेतनेचे लोककल्याणकारी राज्य येऊ शकणार -अ‍ॅड. कारभारी गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नत चेतनेचे, लोककल्याणकारी व कायद्याचे राज्य निर्माण होण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेच्या वतीने गीताभारताला उन्नत चेतनेची विश्‍वगंगा घोषित करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.


स्वतंत्र्याच्या 75 वर्षात भारतात तमस चेतनेचे राज्य सुरू आहे. गीताभारतात जाहीर केलेल्या निरंतर राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आजच्या राज्यकर्त्यांना आणि पुढार्‍यांना नाही. त्याचबरोबर लोकांच्या आणि राष्ट्रांच्या समस्या सोडवण्याचे तंत्र सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये नाही. हा देश आणि या देशातील जनतेची भक्ती या पुढार्यांमध्ये नसल्याने स्वातंत्र्य ज्या कारणासाठी मिळवले त्याचा फायदा सामान्य लोकांना आजपर्यंत मिळालेला नाही. मतं खरेदी करून कोंबडी, दारू देऊन किंवा जातीचा वापर करून मागच्या दाराने सत्तेमध्ये आलेल्या तमस चेतनाधारी सत्ताधार्‍यांनी जनतेच्या तिजोरीला घरी वाहून नेण्याचे काम केले. त्यामुळे देशातील दोन कोटी बेघर जनतेला आजही घरे मिळालेली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


फक्त टीव्हीवर सत्ताधारी मंडळी लोकांची दिशाभूल करून बडेजाव करतात. यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी या देशातील जनतेला विशेषत: मतदारांना जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करावा लागणार आहे. यासाठी संघटनेने गीताभारत प्राणध्यान स्वाध्यायासाठी आग्रह धरला आहे.
भारतीय संविधानाला गीताभारताची जोड दिली तरच, या देशात उन्नत चेतनेचे लोककल्याणकारी कायद्याचे व न्यायाचे राज्य येऊ शकणार आहे. गीताभारत हा कोणत्याही धर्माचा ग्रंथ नाही. गीता भारताला काही मंडळींनी लोकांची दिशाभूल करून, पोथी बनवली आहे. गीता भारत म्हणजे उन्नत चेतनेची विश्‍वगंगा आहे. भारतासह जगभरातील सर्वच लोकशाही राष्ट्रांमध्ये उन्नत चेतनेचे राज्य आणण्याची क्षमता गीताभारतात असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.


गेल्या शंभर वर्षात विकसित झालेल्या कॉन्टम फिजिक्सने गिताभारतात कॉन्टम इन्फॉर्मेशन आणि कॉन्टम कॉन्शेसनेस या दोन्ही बाबी पूर्णत्वाने भरलेल्या असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षात देशभर माजलेल्या लोककर्कासुर आणि न्यायकर्कासुरांना डिच्चू देणे फक्त गीताभारतामुळे आणि जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्रामुळे सुकर होणार आहे.


गीताभारताचे सूत्र म्हणजे समाजातील शोषक, तमस प्रवृत्तीच्या शासनकर्त्यांचा बिमोड करणे आणि उन्नत चेतनेच्या सत्ताधार्‍याकडे सत्ता सुपुर्द करणे हा आहे. यामुळे भारतातील लोकशाहीला गीताभारतासारख्या उन्नत चेतनेच्या क्रांतिकारी मानसशास्त्राची नितांत गरज असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. गीताभारतासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, सुधीर भद्रे, ओम कदम, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे आदी आग्रही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *