• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात संत रविदास महाराजांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचा विविध संघटनांचा निर्णय

ByMirror

Jan 31, 2023

भव्य शोभा यात्रेचे व अभिवादन मेळाव्याचे आयोजन

राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार संघर्ष समितीचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चर्मकार संघर्ष समिती व चर्मकार समाजातील विविध संघटनांना बरोबर घेऊन शहरात रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातून भव्य शोभा यात्रेचे व अभिवादन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती सोहळ्यास सर्व समाज बांधवांना सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन शिवाजीराव साळवे, राजेंद्र बुंदेले, विशाल बेलपवार यांनी केले आहे.


जयंती उत्सव एकत्रित साजरा करण्याच्या नियोजनासाठी नुकतीच सर्व संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक बागरोजा हडको येथे पार पडली. नंदकुमार गायकवाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी संतोष उदमले, ज्ञानेश्‍वर म्हैसमाळे, सुभाष उदमले, कैलास गांगर्डे, अभिजीत खरात, आप्पासाहेब केदारे, विश्‍वनाथ निर्माण, स्वाती सुयोग धस, विठ्ठलराव जयकर, रामकिसन साळवे, अभिजीत शिंदे, शशिकला झरेकर, बाबासाहेब लोहकरे, महेश आहेर, अभिनव सूर्यवंशी, दुर्वेश शेलार, मीनाताई गायकवाड प्रतिभाताई धस, बाळासाहेब केदारे, बापूसाहेब देवरे, कारभारी शिंदे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रविवारी सकाळी 9 वाजता शहरातून संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या शोभा यात्रेची सुरुवात होणार आहे. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वसंत टॉकीज रोड, जुना बाजार, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, नवी पेठ, घुमरे गल्ली, आशा टॉकीज चौक, पांचपीर चावडी, जुनी महानगरपालिका, वाडिया पार्क मार्गे टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे.

यावेळी दुपारी 12 ते 01 वाजे पर्यंत अभिवाद मेळाव्यात गुरू रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *