• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

दिल्लीगेटला गटई कामगारास बेदम मारहाण करणार्‍यावर गुन्हे दाखल करा

ByMirror

Jan 16, 2023

चर्मकार संघर्ष समितीची मागणी

समितीचे संस्थापक अध्यक्ष साळवे यांनी घेतली मारहाण झालेल्या युवकाची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीगेट येथे गटई कामगाराला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे गटई कामगार दिलीप मनोज बोडखे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा केली.


नुकतेच काही दिवसापूर्वी गटई कामगाराला शुल्लक कारणावरुन गटई कामगारास बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसी टिव्हीमध्ये कैद होऊन देखील पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहे.

जिल्ह्यात अनुसूचित समाजातील लोकांवर हल्ले व अत्याचार होत आहे. वारंवार होणारे हल्ले थांबत नसून, या घटनेमुळे तर पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचे शिवाजीराव साळवे यांनी म्हंटले आहे.


मागासवर्गीय समाजावर होणार्‍या अन्यायाचा बिमोड करण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती प्रयत्नशील आहे. दिल्लीगेटला घडलेला प्रकार निंदनीय असून, या प्रकरणात पिडीत युवकाला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर याबाबत लवकरच चर्मकार समाजाचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *