• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले कृती समिती व फुले ब्रिगेडचे सावित्रीबाईंना अभिवादन

ByMirror

Jan 3, 2023

माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार

फुले दांम्पत्यांचा पूर्ण कृती पुतळा त्यांच्या विचाराची व कार्याची प्रेरणा देणार -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले कृती समिती व फुले ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर पुढील जयंती फुले दांम्पत्यांचा पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादनाने उत्साहात साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, अशोक कानडे, पंडित खरपुडे, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, अनंद गारदे, अमित खामकर, प्रा. स्वाती सुडके, रेणुका पुंड, रुपाली पुंड, अनुरिता झगडे, जालिंदर बोरुडे, गणेश बोरुडे, लहू कराळे, किरण जावळे, राजेंद्र कचरे, भाऊ जाधव, उमेश धोंडे, ह.भ.प. गाडळकर आदी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणाची चळवळ चालवून त्यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुले केले. आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे याचे सर्वश्रेय फुले दांम्पत्यांना जाते. या दांम्पत्यांचा लवकरच उभा राहत असलेला पूर्ण कृती पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचाराची व कार्याची प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *