• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शेततळ्यांना संरक्षक कुंपण टाकण्यासाठी जनजागृती करुन कार्यवाहीचे आदेश

ByMirror

Dec 29, 2022

जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांना परिपत्रक जारी

सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेततळ्यांना संरक्षक कुंपण टाकण्याच्या मागणीला यश आले असून, जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयास याबाबत परिपत्रक काढून याबद्दल जनजागृती करुन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे.


जिल्ह्यात शेतकर्‍यांनी आपल्या शेतात शासकीय अनुदानीत शेततळे मंजूर करुन, शेतात मोठे खड्डे खोदून किंवा बाजूने दगड-मातीचा ढिगारा तयार करुन शेततळे तयार केले आहेत. मात्र या शेततळ्यांना संरक्षक कुंपण घालण्यात आलेले नाही. यामुळे अनेक शेततळ्यात लहान मुले पडून बुडाल्याने मृत्युमुखी पडली, तर पोहण्यासाठी गेलेले लहान मुले व युवक देखील मयत झाल्याच्या घटना घडल्या.

या प्रश्‍नावर सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून जिल्ह्यातील सर्व शेततळ्यांना संरक्षक कुंपण सक्तीने टाकण्याची मागणी केली होती. याप्रश्‍नी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.


या पाठपुराव्याची दखल घेऊन निवासी प्र. उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील (रोहयो) यांनी कृषी अधीक्षकांना परिपत्राकाद्वारे सर्व शेततळ्यांच्या सभोवती लोखंडी जाळी तथा संरक्षक कुंपण बसवण्यासाठी शासनस्तरावर शेतक-यांमध्ये क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत जनजागृती करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *